छगन भुजबळांच्या हस्ते माझगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना
शेतकऱ्यांना मदत देण्याची सुबुद्धी शिंदे सरकारला देवो, भुजबळांचं बाप्पांकडे साकडं
मुंबई,३१ ऑगस्ट २०२२ – मुंबई शहरातील माझगाव येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते सहकुटुंब अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, सौ.मीनाताई भुजबळ, सौ.विशाखा भुजबळ, डॉ.सौ.शेफाली भुजबळ यांच्यासह कुटुंबातील व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मदत देण्याची सुबुद्धी शिंदे सरकारला देवो, भुजबळांचं बाप्पांकडे साकडं
गणपतीच्या आगमनावेळी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी चर्चा केली. शिंदे सरकारला अतिृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्याची बुध्दी द्यावी अशी प्रार्थना विघ्हर्त्याकडे केली आहे. त्यांनी शिंदे सरकारच्या कामकाजावर बोट ठेवत मोजक्या शब्दात टीका केली.
ते पुढे म्हणाले कि, शिंदे सरकारला अतिृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची बुध्दी द्यावी अशी प्रार्थना विघ्हर्त्याकडे केली आहे. शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल आम्हाला आशा आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच मागच्या तीन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाचे संकट होत ते संकट थोडे कमी झाले आहे. देशावरील आणि राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी हि आम्ही बाप्पाकडे साकडे घातले आहे. राज्यात कोरोनाच्या संकटानंतर राज्य हिताची कामे होती अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.