मुंबई,१९ नोव्हेंबर २०२२ – दापोली मधील साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून त्यांचा परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबां विरोधात पुरावे सादर करत हे प्रकरण लावून धरलं आहे. परंतु सध्याला तरी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दापोली येथील साई रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांवर आयपीएस कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
माजी मंत्री अनिल परब यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेतजमिनीवर तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. शेतजमिनीचे बिगर शेती जमिनीत रुपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.किरीट सोमय्या परब यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे परब हे वारंवार रिसॉर्ट त्यांचं नसल्याचा दावा करत आहेत. मात्र गुन्हा दाखल झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत.परंतु कोर्टाने परब यांना आज अटकपूर्व जमीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.