फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन : नेटकरी प्रचंड अस्वस्थ

0

नवीदिल्ली,दि, ५ मार्च २०२४- फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या नेटकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे.गेल्या दोन तासांपासून फेसबुक आणि इंस्टाग्राम पूर्णपणे डाऊन झाले आहे. त्यामुळे सातत्याने फेसबुक आणि इंस्टाग्राम वर ऍक्टिव्ह असणाऱ्या नेटकऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे

फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्णपणे डाऊन झाले आहे.नेटकऱ्यांचे फेसबुक लॉग आऊट झाले असून लॉग करताना अडचणी येत आहेत. नेटकऱ्यांनी मंगळवारी (दि.५) रात्री ९ वाजल्यापासून या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही. दरम्यान, सातत्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या नेटकऱ्यांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. फेसबुक वापरता येत नसल्यामुळे नेटकरी अस्वस्थ झाले आहेत.

काही वेळा पूर्वी फेसबुक इंस्टाग्राम पूर्ववत सुरु झाले असले तरी अनेकांना अद्याप पूर्ववत सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.