मुंबई,दि.९ मार्च २०२३ – बॉलिवूडसाठी आणि कलाकारांसाठी एक दुःखद बातमी आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज (गुरुवारी) पहाटे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते.त्यांचे जवळचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन विविध क्षेत्रातील लोक शोक व्यक्त करत आहेत.
सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे आणि त्यावेळी ते दिल्ली, एनसीआरमध्ये होते. त्यांचा मृतदेह गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईला आणण्यात येईल. सतीश कौशिक यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरातील चाहते आणि इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.कारमध्येच सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आला इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कौशिक गुरुग्राम येथे एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
‘मला माहिती आहे, ‘मृत्यू हेच जगाचे अंतिम सत्य आहे!’ पण हे गोष्ट आपला जिगरी दोस्त सतीश कौशक यांच्या निधनबद्दल मी लिहिल, याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!’ असं ट्विट करत अनुपम खेर यांनी मित्र सतीश कौशिकबद्दल आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत.
सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला होता. १९८३ मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. जवळपास ४ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९९३ मध्ये त्यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आत्तापर्यंत त्यांनी वीस पेक्षा अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
अभिनेता म्हणून त्यांनी मिस्टर इंडिया, मोहब्बत, जलवा, राम लखन, जमाई राजा, अंदाज, मिस्टर और मिसेज खिलाड़ी, साजन चले ससुराल, दिवाना मस्ताना, परदेसी बाबू, बड़े मियां छोटे मियां, हसीना मान जाएगी, राजा जी, आ अब लौट चलें, हम आपके दिल में रहते हैं, चल मेरे भाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.तर ‘हम आपके दिल में रहते हैं, हमारा दिल आपके पास है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बधाई, तेरे नाम, क्योंकि, ढोल आणि कागजसारख्या गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. अलिकडच्या काळात त्यांनी म्हणजे गेल्या वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या शर्माजी नमकीन, थार आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या छत्रीवाली आणि इमर्जन्सी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.