कोलकता – प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नाथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.प्रसिद्ध गायक केके यांचं अवघ्या ५३ व्या वयात निधन झालं आहे.त्यामुळे बॉलिवूडसह संगीत क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.
दरम्यान आता केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्याचं वृत्त आहे.त्यामुळे यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांची संमती मिळाल्यानंतर पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह ताब्यात दिला जाईल असे समजते आहे.
One case of unnatural death has been registered with New Market PS regarding the death of singer #KK. After getting the family's consent, an inquest and post-mortem will be done. Arrangements are being made for the postmortem at SSKM hospital, Kolkata.
(File Pic) pic.twitter.com/2afpFwi4Ex
— ANI (@ANI) June 1, 2022
लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण केकेच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टमनंतरच सांगता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते.पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले. आतापर्यंत पोलीस या प्रकरणाची कार्यवाही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून करत आहेत.
कोलकात्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं.विशेष म्हणजे तासाभरपूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीय.
केके यांनी फिल्मसाठी गाणी गाण्यापूर्वी त्यांनी जवळपास ३५००० जिंगल्स गायले आहेत. १९९९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमसाठी त्याने ‘जोश ऑफ इंडिया’ गाणं गायलं. पल या म्युझिक अल्बममधून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली.