ख्यातनाम लेखक भारत सासणेंच्या शुभहस्ते‘‘असोनि मुक्त’’ कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन 

0

नाशिक (प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध लेखिका डॉ. निर्मोही फडके यांच्या ‘असोनि मुक्त ‘कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे  आयोजन नाशिक येथे विश्वास ग्रुप व जनस्थान-जागर कलेचा यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले आहे.

ख्यातनाम लेखक व ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद‍्गीरचे अध्यक्ष मा. भारत सासणे यांच्या शुभहस्ते प्रकाशन  संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास जयदेव ठाकूर असणार आहेत.

रविवार, दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी सायं. ६.०० वा. विशाखा हॉल, कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, अभिनेते व कवी किशोर कदम उर्फ सौमित्र, लेखिका संध्या नरे पवार, कवयित्री व शब्दालय प्रकाशनाच्या सुमतीताई लांडे यांची असणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कवी प्रकाश होळकर, विनायक रानडे, राजू देसले, अभय ओझरकर, सुमीत लांडे व ऋचिता ठाकूर यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.