नवी दिल्ली, १८ जून २०२५ – FASTag Annual Pass 2025 देशातील खासगी वाहनचालकांसाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना जाहीर केली असून, यामध्ये केवळ ३००० रुपयांचा एकदाच पास काढून वाहनचालकांना वर्षभर राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरायची गरज राहणार नाही.
ही योजना १५ ऑगस्ट २०२५ पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. कार, जीप, व्हॅन यांसारख्या खासगी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांनाच ही सुविधा लागू होणार आहे. हा पास २०० प्रवास किंवा एका वर्षापर्यंत (जे आधी होईल) वैध राहणार आहे.
🔧 योजनेचे वैशिष्ट्ये:(FASTag Annual Pass 2025)
एकदाच ३००० रुपये भरणे – वारंवार टोल भरण्याचा त्रास टळणार.
देशभरात लागू – कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्य द्रुतगती मार्गांवर वैध.
फक्त फास्टॅगवरून व्यवहार – वेगळ्या पासची गरज नाही.
200 ट्रिप किंवा 1 वर्षासाठी वैध – जे आधी पूर्ण होईल.
🚘 नवीन टोल धोरणाची ठळक वैशिष्ट्ये:
टोल धोरण प्रति किलोमीटर टोल रेटवर आधारित असणार.
ANPR (Automatic Number Plate Recognition) तंत्रज्ञानाची अंमलबजावणी.
टोल नाक्यांवर गर्दी कमी करण्याचा उद्देश.
फास्टॅग आणि सेन्सर यांचा एकत्रित वापर.
⚠️ चालकांसाठी सूचना:
सरकारने “एक वाहन, एक फास्टॅग” हे धोरण लागू केले असून, बेकायदेशीर वा निष्क्रिय फास्टॅग वापरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकांनी आपले फास्टॅग अपडेट करावेत आणि चुकीचा पास वापरणे टाळावे.
📱 पास कुठून घ्यायचा?
लवकरच राजमार्ग यात्रा अॅप, NHAI व MoRTH च्या वेबसाइट्सवर एक स्वतंत्र लिंक उपलब्ध होणार आहे, जिथून नागरिक हा पास सक्रिय करू शकतील.
🔚 निष्कर्ष:
फक्त ₹3000 मध्ये देशभर वर्षभर टोलमुक्त प्रवास शक्य करून देणारी ही योजना वाहनचालकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या पुढाकारामुळे वेळ, पैसे आणि मनस्ताप वाचणार असून, भारतातील टोल प्रणालीत क्रांतिकारी बदल होणार आहेत.या वार्षिक पासद्वारे खासगी वाहनचालकांना एक जलद, सुकर आणि सुधारित प्रवास अनुभव मिळणार आहे, आणि लाखो लोकांसाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल.
आपल्या पोस्ट मध्ये नितीन गडकरी काय म्हणतात
एक ऐतिहासिक निर्णय घेत, केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०२५ पासून ₹3,000 किमतीचा FASTag आधारित वार्षिक पास सुरु करण्याची घोषणा केली आहे. हा पास सक्रिय झालेल्या तारखेपासून एक वर्ष अथवा २०० प्रवासांपर्यंत (जे आधी होईल) वैध राहणार आहे.ही योजना फक्त खासगी वापरासाठी असलेल्या गैर-व्यावसायिक वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इत्यादी) लागू आहे. यामध्ये देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर सहज, निर्बाध प्रवास शक्य होईल.
पास सक्रियकरण व नूतनीकरणासाठी लवकरच ‘राजमार्ग यात्रा’ अॅप तसेच NHAI आणि MoRTH च्या अधिकृत वेबसाइट्सवर विशेष लिंक उपलब्ध होणार आहे, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होईल.
ही योजना विशेषतः ६० किमी परिघातील टोल नाक्यांवरील दीर्घकालीन अडचणी आणि तक्रारींचा विचार करून तयार करण्यात आली आहे. एका सुलभ व्यवहाराच्या माध्यमातून टोल भरायचा पर्याय दिल्यामुळे वेळ वाचेल, गर्दी कमी होईल आणि टोल नाक्यांवरील वादही टाळता येतील.
महत्वपूर्ण घोषणा। 📢
एक ऐतिहासिक पहल के तहत, 15 अगस्त 2025 से ₹3,000 की कीमत वाला FASTag आधारित वार्षिक पास शुरू किया जा है। यह पास सक्रिय होने की तिथि से एक वर्ष तक या 200 यात्राओं तक, जो भी पहले हो, वैध रहेगा।
यह पास केवल गैर-व्यावसायिक निजी वाहनों (कार, जीप, वैन आदि) के लिए…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 18, 2025