सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात :बस दरीत कोसळली

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख

0

नाशिक,दि.१२ जुलै २०२३ –सप्तश्रृंगी गड घाटात सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बसचा भीषण अपघात झाला असून प्रवासी बस दरीत कोसळली आहे. बसचा सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) असा प्रवास सुरू झाला होता.हि बस रात्री गडावरच मुक्कामी असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.असे समजते आहे.

गणपती टप्प्यावरुन ही बस ४०० फूट खोल दरीत कोसळली असून या बस मध्ये २३ प्रवासी होते.त्यामधील एकाच मृत्यू झाला आहे.

दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत.सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

दरम्यान,जखमींना वणी आणि नांदुरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे कार्यरत आपत्ती व्यवस्थापन (इन्ससर्च व ऑपरेशन) तुकडीने विशेष सहभाग घेत स्थानिक नांदुरी व सप्तशृंगगड ग्रामस्थ यासह श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट तसेच जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाने सांघिक जबाबदारी पेलवत मदतकार्यात महत्वाचे प्रयत्न केले. तसेच टॅक्सी चालक संघटना, श्री क्षेत्र सप्तशृंगगड, नांदुरी, वणी ग्रामस्थांनी आणि महत्वाचे म्हणजे १०८ रुग्णवाहिका आणि जिल्हा आरोग्य विभागाने केलेले वैद्यकीय मदत कार्य केले

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख
जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  
नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.  पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे,अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.