महाभयंकर फेंगल चक्रीवादळामुळे १२ जणांचा मृत्यू : २ कोटी लोक प्रभावित 

पुद्दुचेरीत २० वर्षांतील सर्वाधिक पाऊस :महाराष्ट्रात अनेक भागात पाऊस बरसणार

0

तामिळनाडू,दि,३ डिसेंबर २०२४ – बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फेंगल  वादळाच्या तडाख्याने तामिळनाडूमध्ये हाहा:कार उडाला असून या भयंकर वादळामुळे  १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली. त्यांनी लिहिले- सर्वोतोपरी प्रयत्न करूनही सर्व काही उद्ध्वस्त झाले.या वादळा मुळे ६३ लाख कुटुंबांतील १.५ कोटी लोकांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. विल्लुपुरम, तिरुवन्नमलाई आणि कल्लाकुरिची येथे एकाच दिवसात मोसमात (५० सेमी पेक्षा जास्त) पाऊस पडला, त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. सौदी अरेबियाने वादळाचे नाव दिले ‘फेंगल’ या वादळाचे नाव ‘फेंगल’ सौदी अरेबियाने सुचवले आहे. हा अरबी शब्द आहे, भाषिक परंपरा आणि सांस्कृतिक ओळख यांचे मिश्रण आहे. हा शब्द जागतिक हवामान संघटना (WMO) आणि संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग (UNESCAP) च्या नामकरण पॅनेलमधील प्रादेशिक फरक प्रतिबिंबित करतो.

पुद्दुचेरीत पावसाचा २० वर्ष जुना विक्रम मोडला फेंगल चक्रीवादळ १ डिसेंबर रोजी किनारपट्टीवर आदळल्यानंतर कमकुवत झाले होते, परंतु त्याच्या प्रभावामुळे, मुसळधार पावसामुळे पुद्दुचेरीमध्ये २४ तासांत ४९ सेंटीमीटर पाऊस झाला. २० वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. शहरी भागात पाणी साचल्याने लष्करालाही पाचारण करण्यात आले. लष्कराने २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. एक हजार लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

या भयंकर वादळात २,४१६ झोपड्या, ७२१ घरे, ९६३ गुरे मरण पावली, २ लाख हेक्टर जमीन नष्ट झाली, ९,००० किमी रस्ते, १,९३६ शाळा उद्ध्वस्त झाल्या. सर्व काही तात्पुरते दुरुस्त करण्यासाठी २,४७५ कोटी रुपये लागतील. NDRF निधीतून २  हजार कोटी रुपयांची तात्काळ मदत द्या.अशी मागणी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

वास्तविक, फेंगल वादळ 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता पुडुचेरीमधील कराईकल आणि तामिळनाडूमधील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले. कमकुवत झाल्यानंतर हे वादळ २ डिसेंबरला केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पोहोचले. या राज्यांमध्येही पावसाची संततधार सुरू आहे.तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे भूस्खलन, ५ ठार, २ बेपत्ता तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे एका टेकडीवर भूस्खलन झाले. NDRF च्या म्हणण्यानुसार, सुमारे ४० टन वजनाचा खडक डोंगरावरून खाली घसरला आणि VUC नगरमधील रस्त्यावरील घरांवर पडला, ज्यामुळे २ घरे जमीनदोस्त झाली. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला. २ जण अद्याप बेपत्ता आहेत.

 

 मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातील मुद्दे
वादळ जमिनीवर येण्याच्या वेळी ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू आणि विल्लुपुरममध्ये मुसळधार पाऊस झाला. कल्लाकुरिची, कुड्डालोर आणि तिरुवन्नमलाई येथे रस्ते आणि वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. महापुराचा लोकांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम झाला आहे.

आम्ही बाधित जिल्ह्यांमध्ये मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी तैनात केले. एनडीआरएफच्या ९ टीम आणि एसडीआरएफच्या ९ टीम्सही तैनात करण्यात आल्या आहेत. ३८,००० सरकारी अधिकारी आणि १ लाख प्रशिक्षित प्रथम प्रतिसादकर्ते देखील बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. मदत शिबिर आणि सामायिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आले आहे.

पूरग्रस्त भागातील पाणी काढण्यासाठी १२ हजार मोटरपंप पाठवण्यात आले आहेत. NDRF निधी व्यतिरिक्त, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी एक केंद्रीय टीम देखील पाठविली जाऊ शकते, त्यानंतर संपूर्ण राज्य पुनर्संचयित करण्यासाठी आणखी निधीची मागणी केली जाऊ शकते.

 

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.