नाशिक – नाशिकरोडच्या उपनगर एअर फोर्स वसाहतीत जवळ दहा ते पंधरा दिवसां पासून बिबट्याच्या दहशदीखाली राहणाऱ्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने एयर फोर्स वसाहतीत राहणाऱ्या महिला, मुले हे घराबाहेर जात नव्हते बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.अखेर आज पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.या बिबट्या रेक्सु करून पकडण्यात आला.
लष्कराची जागा असलेल्या या भागात लष्कराच्या विभागाने मोठमोठ्या संरक्षक भिंती बांधल्यामुळे पूर्वीपासून वन्यजीवांचा वापर असलेल्या या भागातुन बाहेर जाण्यासाठी त्यांना जागा नाही..वन विभागाने शनिवार दि.१२ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी पिंजरा लावला होता,या भागात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी होत होती
आज सकाळी पिंजराच्या दिशेने डरकाळी चा आवाज येत असल्याने लष्करातील व पोलिसातील एयरफोर्स मधील अधिकाऱ्याने तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील यांनी पकडलेला बिबट्याला रेस्क्यू केले.या बिबट्याचे वर साडेचार वर्षाचा असून नर जातीचा आहे.आज या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून या बिबट्याला अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
३१ जानेवारीला एअर फोर्स स्टेशन जवळ असलेल्या जयभवानी रोडच्या रहिवासी परिसरात एका बिबटयाने धुमाकूळ घातला होता.त्यावेळी एका वृद्धावर हल्ला करून या बिबट्याने त्याला जखमी केले होते.आठ तासाच्या परिश्रमानंतर वनविभाने या बिबट्याला जेरबंद केले होते