अखेर राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0

मुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२३ – राज्यात पालकमंत्री (Guardian Ministers) पदाचा तिढा अद्याप कायम असून महायुती मध्ये अजित पवार यांच्या गटाला नाशिकसह काही जिह्यातील पालकमंत्री मिळावे या साठी प्रयत्न सुरु आहे. नवीन यादी नुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद गेले असून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूरची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना नाशिकचे पालक मंत्रिपद मिळावे असा दावा अजित पवार गटाने केला जरी असला तरी हे पालकमंत्री पद दादा भुसे यांच्या कडेच राहील असं मुखमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- डॉ.विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदुरबार- अनिल पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.