अखेर नाशिक,सिंधुदुर्गचा तिढा सुटला :सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना उमेदवारी

नाशिकचा उमेदवार लवकरच जाहीर होणार

0

मुंबई,दि, १८ एप्रिल २०२४ –सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाने आपल्या जागेवर दावा कायम ठेवला असून काल झालेल्या बैठकीत नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच मिळणार असून हेमंत गोडसे अधिकृत उमेदवार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे.

दरम्यान रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे.भाजपाने काही वेळा पूर्वी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे.

नारायण राणे उद्या शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत यावरून मागील काही दिवस चर्चा सुरु होती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सभांचा धडाका लावला होता.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.