भाजपाची पहिली यादी जाहीर :९९ उमेदवाराची यादी केली जाहीर 

नाशिक मधून सीमा हिरे,राहुल ढिकले .राहुल आहेर यांना पुन्हा संधी 

0

मुंबई,दि, २० ऑक्टोबर २०२४ –भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश आहे. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे ,तर चांदवड मधून राहुल आहेर ,बागलाण मधून दिलीप बोरसे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.तर नाशिक मध्य मधील विद्यमान आमदार देवयानी फरांदे अद्याप वेटिंग वर आहेत.

पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे.

सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे.ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजच्या पहिल्या यादीत १३ महिलांचा समावेश
१) श्रीजया अशोक चव्हाण – भोकर विधानसभा मतदार संघ
२) अनराधाताई अतुल चव्हाण – फुलंब्री विधानसभा मतदार संघ
३) सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ
४) सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ
५) मंदा विजय म्हात्रे – बेलापूर विधानसभा मतदार संघ
६) मनीषा अशोक चौधरी – दहिसर विधानसभा मतदार संघ
७) विद्या ठाकूर- गोरेगांव विधानसभा मतदार संघ
८) माधुरी सतीश मिसाळ – पर्वती विधानसभा मतदार संघ
९) मोनिका राजीव राजले – शेगाव विधानसभा मतदार संघ
१०) प्रतिभा पचपुते – श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ
११) नमिता मुंदडा – केज विधानसभा मतदार संघ
१२) श्वेता महाले – चिखली विधानसभा मतदार संघ
१३) मेघना बोर्डीकर – जिंतूर विधानसभा मतदार संघ

भाजपची पहिली उमेदवार यादी 

BJP LIst maharashtraBJP LIst maharashtra
BJP LIst maharashtra BJP LIst maharashtraBJP LIst maharashtra

BJP LIst maharashtra

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.