मुंबई,दि.२८ मार्च २०२४ –राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात चुरस बघायला मिळते आहे.महाविकास आघाडीतील ठाकरे गट,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena Shinde Group)मात्र अद्याप एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. आज शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी जाहीर होऊ शकते,अशी चर्चा समोर आली आहे.या यादीत कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार,हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान,मागील काहीदिवसांपासून वाद सुरूअसलेल्या नाशिक,यवतमाळ,रायगड,ठाणे आणि मुंबई या जागांवर प्रामुख्यानं लक्ष आहे.महायुतीत अखेर या जागांचा तिढा सुटलाय का? आणि तिढा सुटला असेल तर या जागा कोणाच्या वाट्याला जाणार?हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे