एम आर एफ मोग्रीप राष्ट्रीय मोटर सायकल रॅलीची पहिली फेरी नाशकात
स्पर्धेदरम्यान छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन
नाशिक ,दि,२ एप्रिल २०२४ –मोटर क्रीडाप्रेमींमध्ये जोश आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी भारतातील प्रमुख राष्ट्रीय स्पर्धक नाशिक मध्ये ए डब्लू इव्हेंट आयोजित एम आर एफ मोग्रीप दुचाकी स्पर्धेसाठी सज्ज असतील .रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी घोटी वैतरणा रोड वरील धरनोली या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिप रॅली चे आयोजन करण्यात आले आहे .
एम आर एफ ,टी व्ही एस अपाची ,ग्रीन हेरिटेज रिसॉर्ट, गोदा श्रद्धा फौंडेशन , मोस्टर एनर्जी ड्रिंक्स हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत.तर नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले आहे . या स्पर्धेत पेट्रोनास टी व्ही एस व हिरो मोटर्स च्या खेळाडूंचा विशेष सहभाग आहे . रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी घोटी वैतरणा रोड वरील धरनोली गावापासून सकाळी आठ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे . एकूण ५६ किलोमीटर्स अंतरामध्ये हि स्पर्धा होणार असून १४ किलोमीटर्स चे चार सरळ राउंड होणार आहे .
स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनी सकाळी ७ वाजेच्या आत स्पर्धात्मक मार्गात प्रवेश करून आपली वाहने सुरक्षित रित्या उभी करावी. ७ वाजे पश्चात सर्व वाहनांना स्पर्धांमार्गावर प्रवेश बंद राहील.दि .शनिवार ६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता वाहन तपासणी होऊन स्पर्धेचे औपचारिक उदघाटन करण्यात येणार आहे . हि स्पर्धा एकूण १० विविध गटांमध्ये खेळवण्यात येणार आहे . या मध्ये स्कुटर्स तसेच विदेशी बनावटीच्या गाड्या सहभागी असणार आहेत . नाशिककर मोटार क्रीडा प्रेमींनी आणि स्थानिक रहिवाश्यांनि स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रॅली चे क्लार्क ऑफ दि कोर्से तथा ए डब्लू इव्हेंट चे संस्थापक अमित वाघचौरे यांनी केले.
या रॅलीचे मुख्य वाहन तपासनीस म्हणून माजी राष्ट्रीय विजेता तथा FMSCI चे वरिष्ठ तांत्रिक समन्वयक रवींद्र वाघचौरे हे काम पाहत आहे. तर स्पर्धा संबंध अधिकारी म्हणून हर्षल कडभाने हे काम बघत आहे .
छायाचित्र स्पर्धा
या स्पर्धेदरम्यान छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे . दैनिकात छापून आलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रासाठी अनुक्रमे ३०००/- २०००/- व १०००/- रुपये रोख , व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत . या छायाचित्र स्पर्धेचे निकष पुढील प्रमाणे असणार आहे . दैनिकात छापून आलेल्या छायाचित्रासाठीच हि स्पर्धा असणार आहे . सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . या स्पर्धेसाठी छापून आलेले फोटो चे वृत्तपत्रातील कात्रण व ८ x १० आकारातील फोटो शार्प मार्क रबर स्टॅम्प ,जुने सी बी एस स्थानकाजवळ , सी बी एस येथे शुक्रवार दि १२ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावयाची आहेत .