पाचशे वर्षांची तपश्चर्या पूर्ण : अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात रामलल्ला विराजमान
राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण
अयोध्या,दि. २२ जानेवारी २०२४ – आज ५०० वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत आहे. संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२:२९ वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
रामलला अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. शंख फुंकत आणि मंत्रोच्चार करत रामलला आपल्या भव्य गर्भगृहात बसले. पंतप्रधान मोदींनी एका शुभ मुहूर्तावर राम लल्लाला अभिषेक केला. यानंतर जय श्री रामच्या घोषणांनी अयोध्या दुमदुमली.यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात पूजा केली आणि त्यानंतर आरती केली. रामनगर अयोध्येसह संपूर्ण देश राममय झाला आहे. आज राम भक्तांना राम मंदिर होणार आहे आणि रामलला त्यांच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत.
या शुभ दिवशी, राम मंदिर फुलांनी आणि विशेष दिव्यांनी सजवले गेले आहे आणि संपूर्ण शहर धार्मिक उत्साहाने भरले आहे.फ्लायओव्हरवरील पथदिवे प्रभू रामाच्या कलाकृतींनी तसेच धनुष्यबाणांच्या कटआऊट्सने सजवलेले आहेत आणि सजावटीच्या दीपस्तंभांवर पारंपारिक “रामानंदी टिळक” वर आधारित डिझाइन आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा शुभ मुहूर्त
२२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त १२:२९ वाजून ८ सेकंद ते १२:३० मिनिटे ३० सेकंदचा आहे.याचा अर्थ श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी ८४ सेकंद अतिशय महत्त्वाचे आहेत.या शुभ मुहूर्तावर पूजा करण्यात आली’
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट
कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय की,”अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम.”
अयोध्या धाम में श्री राम लला की प्राण-प्रतिष्ठा का अलौकिक क्षण हर किसी को भाव-विभोर करने वाला है। इस दिव्य कार्यक्रम का हिस्सा बनना मेरा परम सौभाग्य है। जय सियाराम! https://t.co/GAuJXuB63A
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे क्षणचित्रे
#WATCH | Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/YbdbHDcXqX
— ANI (@ANI) January 22, 2024