सिन्नर जवळील भीषण अपघातात नाशिकच्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू 

0

नाशिक ,९ डिसेंबर २०२२ – नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा नाशिक पुणे रोडवर सिन्नर जवळील मोहदरी घाटात भीषण अपघात झाला आहे. मित्राच्या लग्नाहून परतताना मोहदरी घाटात हा भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे गंगापूर रोडवरच्या केटीएचएम महाविद्यालयाचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातात ३ युवती आणि २ युवकांचा समावेश आहे.

मित्राच्या लग्नातून परतत असतांना मोहदरी घाटाच्या सुमारास सिन्नरहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या स्विफ्ट कारचा टायर फुटला आणि कार विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून थेट दुसऱ्या लेनला जावून आणखी एका वाहनाला धडक धडकली. टायर फुटलेल्या गाडीत पाच जण असल्याचे समजले. हे पाचही जण महाविद्यालयीन विद्यार्थी होते. ज्या गाडीला धडक बसली त्यातीलही प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे. गाड्यांची स्थिती पाहून हा अपघात किती भीषण असेल याची प्रचिती येते.

या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये तीन तरुणी आणि दोन तरुणांचा समावेश असल्याचे समजते.दरम्यान, काल दुपारी देखील नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे या गावाजवळ बसने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर २५ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यातच आज पुन्हा सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात झाला आहे.

व्हिडीओ बघा 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.