नाशिक (प्रतिनिधी):भारताच्या साजरा होणाऱ्या ७५ व्या स्वातंत्र महोत्सव वर्षानिमित्त गणेश उत्सव २०२२ हे वर्ष ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तर्फे महाराष्ट्राच्या लोककलांच्या सादरीकरणाने ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आले.
३१ ऑगस्ट रोजी श्री गणरायाच्या स्थापनेनंतर ह.भ.प.डॉ.श्री.रामकृष्ण लहवीतकर महाराज यांच्या सूरमधूर वाणीच्या किर्तनने सोहोळ्याची सुरुवात झाली.१ सप्टेंबर रोजी गोदावरी बँकेचे डायरेक्टर अॅड. दत्तात्रय पिंगळे, भद्रकाली पोलीस स्टेशनचे पी.आय. ठाकूर सर आणि पी.आय. चव्हाण सर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती होऊन भर पावसात वॉटर प्रूफ मंडपात नाशिक येथील नृत्यांगण संस्थेच्या संचालिका किर्ती भवाळकर व सौ.विद्या देशपांडे यांच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना, पदन्यास सारखे अनेक नृत्यप्रकार सादर केले.
२ सप्टेंबर रोजी महाआरतीनंतर शाहीर स्वप्निल डुंबरे यांचा शिवशंभू हा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे चरित्र रेखाटणाऱ्या पोवाड्यांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला.
३ व ४ सप्टेंबर रोजी अमोल पाळेकर प्रस्तुत “लोककला महाराष्ट्राची” हा महाराष्ट्रातील विविध लोककला आणि नृत्य यावर आधारित गायन नृत्यांचा २८ कलाकारांचा सहभाग असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री कृष्ण, श्री विठ्ठल, भारतमाता, श्री खंडेराय, शिवाजी महाराज यांच्या रूपांचे सादरीकरण करण्यांत आले. या कार्यक्रमात नृत्यासाठी खास मुंबईहून मोना डोंगरे व त्यांचा नृत्यसमूह यांच्या तर्फे विविध लोककलांवर आधारीत अंदाजे १८ नृत्य सादर झालीत. यामध्ये मुख्य गायनाची बाजू झी मराठी लिटिल चॅम्पस् विजेती गौरी गोसावी, युवा सिंगर एक नंबर उपविजेता चेतन लोखंडे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक जितू देवरे, अश्विनी सरदेशमुख यांच्यासोबत अमोल पाळेकर यांनी जवळपास ३६ गाणी सादर केलीत. यांना नाशिकमधील प्रथितयश वादक कलाकारांनी आपल्या वादनातून सजवले.
५ व ६ सप्टेंबर रोजी आर.एम.ग्रुप प्रस्तुत “रंग मराठमोळा” हा शुभांगी साळवे व सहकारी यांनी लोककलेच्या विविध नृत्य प्रकारांचा कार्यक्रम सादर झाला. ज्यामध्ये विविध नृत्य प्रकार सादर केले गेले.
७ सप्टेंबर रोजी नुपूर महिला मंडळ, आकृती ग्रुप, संस्कार भारती, झिम पोरी झिमच्या महिला मंडळांनी मंगळागौरीचे साधारण ७० विविध प्रकार गाणी, नृत्य, उखाणे रूपातून सादर केलेत.
८ सप्टेंबर रोजी ब्रम्हाव्हॅलीच्या एम.बी.ए., इंजिनिअरिंग महाविद्यालय व शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य व वक्तृत्व कलेतून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
९ सप्टेंबर रोजी श्री गणरायाच्या समोर श्री सत्यविनायक पूजेचे नियोजन करण्यांत आले होते. त्यानंतर तिबेटियन मार्केट ते चोपडा लॉन्स या परिसरात १५० ढोल ताशांच्या वाद्यांच्या गजरात श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.
नाशिकमधील सर्व गणेशभक्तांनी व नाशिकच्या रसिक प्रेक्षकांनी “ब्रह्मा व्हॅली गणेशोत्सव २०२२” मध्ये सादर होणाऱ्या विविध कलाविष्कारांचा आस्वाद प्रत्यक्ष व फेसबुक आणि यु ट्यूब च्या माध्यमातून घेतला.
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील व सरचिटणीस गौरव पानगव्हाणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम शरणपूर पालिका बाजार, तिबेटीयन मार्केट परिसरात दहा दिवस साजरा करण्यात आले. सर्व प्रेक्षकांचे व यामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व तंत्रज्ञांचे मनःपुर्वक आभार मानून या उत्सवाची सांगता झाली.