नाशिक, दि. १२ जुलै २०२५ – परदेशी भाषा शिक्षणाला प्रोत्साहन देणारी संस्था FLOA (Foreign Language Online Application) आणि महात्मा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “परदेशी भाषा शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती फ्लोराचे संस्थापक व प्रकल्प प्रमुख शैलेश लेले यांनी दिली आहे
हे चर्चासत्र आज शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता पंचवटी, नाशिक येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे डेंटल कॉलेज ऑडिटोरियम येथे होणार आहे.या चर्चासत्रामध्ये परदेशी भाषा शिक्षणाची गरज, संधी, CSR सहकार्य, धोरणात्मक अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांवर होणारा सकारात्मक परिणाम यावर सखोल चर्चा होणार आहे. FLOA संस्थेचा उद्देश कोणत्याही पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एक परदेशी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
कार्यक्रमामध्ये अनेक नामवंत वक्ते सहभागी होणार आहेत:(Foreign Language Online Application)
श्रीमती अपर्णा मठकरी, Cluster Head – Ashoka Group of Schools
डॉ. अनुराधा नांदूरकर, उपप्राचार्य, के. के. वाघ कॉलेज
श्री. कुंगार गोरख, नाशिक जिल्हाध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ
श्रीमती सानिया रमाणी, फ्रेंच भाषा तज्ञ, दिल्ली पब्लिक स्कूल
श्री. प्रकाश कोल्हे, संस्थापक, मानवधन संस्था
श्रीमती स्मिता गुरव, CSR प्रमुख, Lucy Electric India Pvt. Ltd.
कार्यक्रमाच्या निमंत्रक श्रीमती शिल्पा मेनन या अनुभवी जर्मन भाषातज्ञ असून, इनर व्हील क्लब नाशिकच्या माजी अध्यक्ष आहेत.
कार्यक्रमात वरिष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ श्रीमती विद्या पिंगळे यांना ‘वाणी विकास सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती रमा गर्ग (डिस्ट्रिक्ट चेअरमन, इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३०३), आणि प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अपूर्व हिरे (महात्मा गांधी विद्यालय समन्वयक) व ऋचिता ठाकूर (रेडिओ विश्वास समन्वयक) यांची उपस्थिती लाभणार आहे.
सन्माननीय अतिथी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमात FLOA द्वारे आयोजित परदेशी भाषा परीक्षेत (जून २०२५) यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे.
पत्रकार बंधू-भगिनींना याकरिता मनःपूर्वक आमंत्रण देण्यात येत आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क:
📞 8805090066 | 📧 floa.education@gmail.com | 🌐 www.floa.education