नाशिकमधील सुवर्णतीर्थ ज्वेलर्स दालनाचे आज औपचारिक उद्घाटन
नववधूसाठी सात ग्रामचा नेकलेस, लहानग्यांसाठी सातशे मिलीग्राम अलंकारांची उपलब्धता
नाशिक,२६ जानेवारी २०२३ – नववधूसाठी सात ग्रामचा नेकलेस आणि लहानग्यांसाठी सातशे मिलीग्राम चे अलंकार या संकल्पना काल्पनिक वाटत असल्या तरी शहरात आता त्या उपलब्ध होणार आहेत. उद्या प्रजासत्ताकदिनी शुभारंभ होत असलेल्या सुवर्णतीर्थ ज्वेलर्स दालनात शहरवासीयांनी कधीही न अनुभवलेल्या अलंकारांची उपलब्धता राहणार असून कायद्याच्या चौकटीतील भिशीचेही इथे प्रत्यंतर येणार असल्याने शहरवासीयांच्या तो औत्सुक्याचा भाग ठरणार आहे.
कॅनडा कॉर्नर परिसरात हे दालन आजपासून (दि. २६) सुरु होत असल्याची माहिती संचालक अजय लोखंडे यांनी दिली. कुरुविल्ला अपार्टमेंट येथे साकारलेल्या या दालनाचे उद्घाटन एअरफोर्स ग्रुप कॅप्टन व्ही. एस. कामत आणि कर्नल राजीव कपूर यांच्या हस्ते होणार आहे. अधिक माहिती देताना श्री लोखंडे म्हणाले, सदर दालनात १८, २२ आणि २४ कॅरेट सुवर्ण अलंकार तसेच चांदीचे अलंकार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या चौदा वर्षांपासून वित्त कंपनी संचलित करताना नाशिककरांचा नेमका कल कुठे आहे, याचा शास्त्रोक्त अभ्यास करून सराफी व्यवसायात पदार्पण करण्याचा आपण निर्णय घेतला. आमच्या दालनात नववधूसाठी सात ग्रामचा नेकलेस आणि लहानग्यांसाठी सातशे मिलीग्रामचे अलंकार यांसारखे आजवर न अनुभवलेले प्रकार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दालनाची ही खास वैशिष्ट्ये
सोन्या-चांदीची वैविध्यपूर्ण अलंकार श्रेणी, कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजांची पूर्तता करण्याकडे कल, ग्राहकांच्या खिशाला परवडणारी उत्पादने, सर्व अलंकार एचओआयडी मोहोरसह, गरजेनुरूप आणि मागणीनुरूप पुरवठा, विविध प्रकारचे गिफ्टस आदी सुवर्णतीर्थ ज्वेलर्स दालनाची खास वैशिष्ट्ये असल्याचे श्री लोखंडे म्हणाले. दालनाची अंतर्गत सजावट विलोभनीय पद्धतीने करण्यात आली असून नाशिककरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संचालक श्री लोखंडे आणि व्यवस्थापक पूजा वाघ यांनी केले आहे.
सुवर्णतीर्थ ज्वेलर्स महाराष्ट्रात प्रथमच एक अनोखी संकल्पना राबवणार आहे. त्यानुसार ग्राहकांना केवळ रु. २५० दैनंदिन अथवा रु. ६,५०० दरमहा भरण्याची मुभा राहील. पहिले दागिना आणि नंतर भरणा अशी अद्वितीय योजना सर्वसामान्यांसाठी साकारली जाणार आहे. त्यामुळी सोन्याच्या झळाळी सोबत ग्राहकांना लाभ होणार आहे. याशिवाय ग्राहकांना पैसे घरच्या घरी भरता येण्याची सुविधा राहील. त्यासाठी क्यूआर कोड या माध्यमाचा वापर आर्त येईल. यामुळे ग्राहक विश्वासार्हता जपली जाईल. थोडक्यात प्रजासत्ताकदिनी सुवर्ण स्वातंत्र्याची प्रचीती नाशिककरांना येणार आहे. सुवर्णतीर्थ ज्वेलर्स दालनात केवळ १४ व्या दिवशी दागिना ताब्यात मिळणार आहे. याशिवाय कमी वजनाचे आणि प्रमाणित दागिने मिळण्यासाठी हॉलमार्कयुक्त प्रमाणाचा वापर होणार असल्याचेही संचालक श्री लोखंडे यांनी सांगितले.