ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू 

0

मुंबई – क्रिकेटच्या  चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे.ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री १०.३० वाजता कार अपघातात मृत्यू झाला आहे.टाऊन्सविलेच्या पश्चिमेला ५० किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये हा कार अपघात झाला.यावेळी  सायमंड्स स्वतः कार चालवत होते. अचानक त्यांची कार रस्ता सोडून उलटली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो जखमी झाला. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी एका निवेदनातून दिली आहे.

सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सायमंड्सचे या वर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे. ‘क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे’, असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटलंय. मैदानावर आणि त्यापलीकडेही आमचे सुंदर नाते होते, असं पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाकडून २६ टेस्ट आणि १९८ वन-डे सामने खेळणाऱ्या सायमंड्सनं क्रिकेट विश्वावर मोठा ठसा उमटवला. तो १९९९ ते २००७ या कालावधीमध्ये क्रिकेट विश्वावर एकछत्री राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा सदस्य होता. सायमंड्सनं टेस्ट क्रिकेटमध्ये २ शतक आणि १० अर्धशतकांसह १४६२ रन केले. तर वन-डेमध्ये ६ शतक आणि ३० अर्धशतकांच्या मदतीनं त्याने ५०८८ रन  काढले.

२००३ च्या विश्व कप स्पर्धेत जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तान विरोधात केलेली १४३ धावांची खेळी लक्षात राहिली. याशिवाय भारताविरुद्धच्या अंतिम फेरीतील सामने देखील त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली. २००७ च्या वेस्टइंडीज मधील वर्ल्डकप मध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.