माजी आमदार बबन घोलप यांचा शिवसैनिक पदाचा राजीनामा.   

0

नाशिक,दि,१५ फेब्रुवारी २०२४ –नाशिकरोड देवळाली मतदार संघाचे माजी आमदार,शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबन घोलप यांनी आज शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासुन बबन घोलप नाराज असल्याचे बोललेजात होते.अखेर आज त्यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे पाठवला आहे.यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाकडून घोलप यांची कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याने गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील ते उपस्थित राहिले नाही. तसेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात बबन घोलप काय म्हणतात ..
मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देतआहे.कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केलेआहे.मला पक्षाने (संघटनेने)जे जे सागींतले,ते प्रामाणीकपणे केले आहे.पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करन्यात आले व मी ज्यांना निष्क्रीय पदाधीकारी काढुन टाकले होते.व नविन पदाधीकारी नेमले होते.त्यांना ही बदलण्यात आले,हे कितपत बरे आहे.सर्वात महत्वाच म्हणजे एकनिष्ठ शिवसैनीक अमर कतारीला कुठच ठेवल नाही.विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संर्पक प्रमुखांनी लेखी कळवले होते,की हे जुने पदाधीकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत.ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहुन मी अचंबित आहे.नेमक माझ काय चुकल ते समजल नाही.मी याबाबद दादही मागीतली पण काहीच ऊत्तर मिळाल नाही.
माझे वकिली करणारे ही  गप्प आहे.त्यापेक्षा आपण थांबून घेणे महत्वाचे वाटते.म्हणुन मी माझा शिवसैनीक पदाचा राजीनामा देत आहे.
आपला
बबन घोलप

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.