निमाच्या वर्धापनदिनानिमित २४ जानेवारीला माजी अध्यक्षांचा सत्कार सोहळा

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या स्नेह मेळाव्याचेही आयोजन

0

नाशिक,२३ जानेवारी २०२३ – नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील नामांकित असलेल्या नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरिंग अससोसिएशन  (निमा) चा वर्धापन दिन मंगळवार दि.२४ जानेवारीला दुपारी ४ वाजता निमाच्या आयटीआय सिग्नलजवळील कार्यालयात साजरा होणार आहे. त्याचेच औचित्य साधून संस्थेचे माजी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्नेहमीलन आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणारी अत्यंत महत्वाची आणि जुनी संघटना म्हणून निमाची ओळख आहे.पाच दशकांहून अधिक काळापासून या संस्थेने उद्योगांच्या नवनवीन गुंतवणुकीसाठी व  उद्योजकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे.त्यामुळेच निमाला केवळ नाशकातच नव्हे तर राज्य आणि देशपातळीवरही सन्मान लाभला आहे.गेली दोन वर्षे या संघटनेच्यादृष्टीने अत्यंत वाईट गेली. परंतु या संस्थेवर विश्वस्त म्हणून २१ जणांना संधी मिळाली आणि  धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने पुन्हा एकदा कात टाकल्याने उद्योजकांमध्ये खुशीची लहर असून संस्थेला पुन्हा सुगीचे दिवस येतील अशा विश्वासही त्यांच्यातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच हा जाहीर कार्यक्रम होत असल्याने उद्योजक सुखावले आहेत.माजी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या सत्काराबरोच माध्यम प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्नेहमिलन सोहळ्याने या कार्यक्रमाची रंगत वाढणार असल्याचेही बेळे यांनी स्पष्ट केले.

वर्धापन दिनाच्या यशस्वीतेसाठी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, किशोर राठी,मानद सचिव राजेंद्र अहिरे,कोषाध्यक्ष विरल ठक्कर,सचिव हर्षद ब्राह्मणकर आणि सर्व नूतन विश्वस्त प्रयत्नशील आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!