पुणे,२४ फेब्रुवारी २०२३ – भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज पुण्यात निधन झाले.ते ८९ वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
देवीसिंह शेखावत यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान होते.देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह ७ जुलै १९६५ रोजी झाला होता. माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा पाटील आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देविसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहेत.