पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

0

पाकिस्तान,दि ९ मे २०२३ – भ्रष्टाचाराच्या आरोप असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हाय कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर पाकिस्तानी पोलिसांना त्यांना अटक केली.दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

इमरान खान यांच्या पक्षाचे नेते मुसर्र्त चीमा यांनी ट्वीट करत अटक करणारे सुरक्षा अधिकारी यांनी इमरान खान यांना टॉर्चर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इमरान खान यांना मारहाण केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. पीटीआयने जो व्हिडीओ ट्विट केला आहे की, त्यात इमरान खान यांचे वकील जखमी दिसत आहे.इम्रान खान यांच्या अटके नंतर लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याचे पीटीआय पक्षाने म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.