घरगुती वीज ग्राहकांनी गाठला सौर ऊर्जेचा ‘ १,००० मेगावॅट’ टप्पा!

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यघर मोफत वीज योजनेतील यशस्वी कामगिरी

0

नाशिक/मुंबई, दि. 14 ऑगस्ट 2025 Free Electricity Scheme India स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांनी अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात मोठा मैलाचा दगड पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत राज्यातील घरांच्या छतांवर बसविण्यात आलेल्या सौर प्रकल्पांची एकत्रित वीजनिर्मिती क्षमता आता 1,000 मेगावॅट म्हणजेच एक गिगावॅटवर पोहोचली आहे.

या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहक, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी तसेच प्रकल्प बसविणाऱ्या पुरवठादारांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर यांच्या सक्रिय पाठबळाने ही योजना राज्यात जलदगतीने राबविण्यात आली.

फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रातील सुमारे 2.5 लाख ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून तब्बल 1,870 कोटी रुपयांचे थेट अनुदान मंजूर झाले आहे.

जिल्हानिहाय आघाडी(Free Electricity Scheme India)

राज्यातील जिल्ह्यांमध्ये नागपूरने 40,152 लाभार्थी आणि 157 मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ पुणे (89 मेगावॅट), जळगाव (70 मेगावॅट), अमरावती (63 मेगावॅट), छत्रपती संभाजीनगर (59 मेगावॅट) आणि नाशिक (55 मेगावॅट) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

योजना कशी घ्यावी?

घरगुती वीज ग्राहक किंवा गृहनिर्माण संस्था या योजनेचा लाभ https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून घेऊ शकतात.

1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 30,000

2 किलोवॅटला 60,000

3 किलोवॅटला 78,000 अनुदान

गृहनिर्माण संस्थांना 500 किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट 18,000 अनुदान

सौर प्रकल्प बसवल्यानंतर पुढील 25 वर्षे मोफत वीज निर्मितीचा फायदा मिळतो. घरातील गरज भागल्यानंतर उरलेली वीज महावितरणला विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.

सौर ऊर्जेकडे वाढते आकर्षण

हवामान बदल आणि वाढते वीजदर यामुळे घरगुती ग्राहक आता पारंपरिक वीजपुरवठ्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारत आहेत. स्वच्छ, मोफत आणि दीर्घकालीन फायदेशीर असल्याने ‘सूर्यघर’ योजना नागरिकांसाठी आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!