१३ फेब्रुवारीपासून यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची आणि लवंगी मिरची या दोन नवीन मालिका भेटीला
प्रबोधनपर मालिका आणि फॅमिली ड्रामा यामुळे प्रेक्षकांची दुपार होणार खास!
मुंबई,१६ जानेवारी २०२३ – झी मराठी ही अशी वाहिनी आहे जी नेहेमी नवनवीन प्रयोग करत असते, झी मराठीवर नेहेमीच वेगवेगळे विषय हाताळले जातात मग ते कौटुंबिक असुदे ऐतिहासिक किंवा मग कॉमेडी. हाच वेगळेपण जपत झी मराठी प्रेक्षकांची दुपार खास करणार आहे, कारण १३ फेब्रुवारीपासून ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’ आणि ‘लवंगी मिरची’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
“यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची” ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, या मालिकेची निर्मिती केली आहे पिकोलो फिल्म्स ने (वीरेन प्रधान). या आधी वीरेन प्रधान यांची उंच माझा झोका ही मालिका झी मराठीवर खूप गाजली होती. तर “लवंगी मिरची” ही मालिका एका डॅशिंग मुलीची आहे जी अन्याया विरुद्ध आवाज उठवतेय, आपल्या आईला हक्क मिळवून देण्यासाठी लढतेय. या मालिकेची निर्मिती केलेय रुची फिल्म्स (संगीत कुलकर्णी). संगीत कुलकर्णी यांच्या अस्मिता आणि शुभंकरोती या मालिका झी मराठीवर गाजल्या आहेत. या मालिकेतून लागीर झालं जी फेम शीतली म्हणजेच शिवानी बावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रबोधनपर मालिका आणि फॅमिली ड्रामा यामुळे १३ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांची दुपार खास होणार हे निश्चित. तेव्हा पाहायला विसरू नका “यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची” दुपारी १२.३० वा. आणि “लवंगी मिरची” दुपारी १ वा. झी मराठीवर रसिकांच्या भेटीला येत आहेत. प्रबोधनपर मालिका आणि फॅमिली ड्रामा यामुळे प्रेक्षकांची दुपार होणार खास !