नाशिकमध्ये रंगला महापैठणीसाठीचा खेळ : महाविजेत्याला मिळणार ११ लाखांची पैठणी 

0

नाशिक –नाशिकमध्ये आज दिनांक ७ एप्रिल रोजी महापैठणीच्या विजेत्याच्या निवडीसाठी पहिली फेरी घेण्यात आली. नाशिकच्या कानकोपर्‍यातून महिलावर्गाची उपस्थिती पाहायला मिळाली. ५०० पेक्षा अधिक महिलांनी पारंपारिक वेशभूषेत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. नाशिकमधून १०० विजेत्या महिलांची निवड करण्यात आली आहे. नाशिकमधून विजेत्या महिलेला ११ लाखाची पैठणी जिंकण्याची संधी आहे.

दार उघड बये दार उघड…..असं ऐकले तरी घराघरातल्या वहिन्यांचे कान टवकारतात आणि भावोजी आपल्या घरी कधी येतील याची वाट बघतात? झी मराठीवरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली १८ वर्ष सातत्याने सुरु आहे आणि आदेश बांदेकर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करतात. यापूर्वी, सासु स्पेशल, सुनबाई स्पेशल, जाऊबाई स्पेशल, सेलिब्रिटी स्पेशल, इतकेच काय तर लॉकडाऊन स्पेशल पर्वाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लवकरच या कार्यक्रमाचे नविन पर्व घेऊन झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

यानिमित्ताने आदेश भावोजींनी पत्रकारांशी संवाद साधला आणि होम मिनिस्टरचा आजवरचा प्रवास उलगडला. “होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या १८ वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्ये देखील होम मिनिस्टरने घरच्या  वहिनींना पैठणीचा मान दिला आणि यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि ११ लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस रंगेल. हि ११ लाखांची पैठणी कशी असेल हे  पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे, त्यामुळे महामिनिस्टर या नवीन पर्वासाठी मी देखील खूप उत्सुक आहे.”

लवकरच महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधून प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे. आणि यातून निवडण्यात आलेल्या महाविजेत्याला मिळणार आहे ११ लाखाची पैठणी. महराष्ट्रातून या पर्वाला भरभऊन प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही. ही मानाची पैठणी कोण जिंकणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.