कलर्स मराठी वरील मालिकांमध्ये गणरायाचे थाटामाटात आगमन !

0

मुंबई २९ ऑगस्ट, २०२२- बाप्पाच्या आगमानाची वाट दरवर्षी आपण सगळेच अगदी त्याला निरोप दिल्या पासून बघत असतो. तो कधीच आपल्याला सोडून जाऊ नये अशी आपली इच्छा असते. म्हणून आपण म्हणतो देखील पुढच्या वर्षी लवकर या ! आता सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहात, थाटामाटात सुरू आहे.आतुरतेने सगळेच श्री गणेश आगमनाची वाट बघत आहेत. सजावटीची तयारी, रोषणाई, बाप्पासाठी गोडधोड पदार्थ सगळ्याची तयारी सुरु झाली आहे. कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये गणरायाचे धुमधडाक्यात आगमन होणार आहे. भाग्य दिले तू मला, राजा रानीची गं जोडी, जीव माझा गुंतला, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकांमध्ये विशेष भाग बघायला मिळणार आहे. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात सूरवीर गणरायासाठी सुरेल गाणी सादर करणार आहेत.

भाग्य दिले तू मला मालिकेत रत्नमाला मोहितेंच्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे. रत्नमाला यांना बाप्पाचा संकेत मिळणार आहे कि, कावेरी राजसाठी योग्य आहे. कावेरी, राज आणि घरातील सगळे मिळून सजावटीची तयार करताना दिसणार आहेत. रत्नमाला, कावेरी खास बाप्पासाठी मोदक बनवणार आहेत. जीव माझा गुंतला मालिकेत खानविलकरांच्या घरात गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होणार आहे. सगळे मिळून बाप्पाची पूजा करणार आहेत, नैवेद्य दाखवला जाणार आहे. मल्हार – अंतरा मिळून आरती करणार आहेत. पण, याच दरम्यान घरात मेघ देखील घरात येणार आहे. आता मेघच्या येण्याने कोणते संकट येईल ? हे कळेलच. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिका आणि अभि मिळून गणरायाची स्थापना करणार आहेत. अभिलाषा अभिमन्यूच्या विरोधात काही तरी कट कारस्थान करताना दिसणार आहे. आता हे आलेलं विघ्न कसं दूर होईल ? काय आहे नक्की अभिलाषा च्या मनामध्ये ? हे मालिकेमध्ये बघायला मिळेल.

तेव्हा नक्की बघा गणपती विशेष सप्ताह २९ ऑगस्ट पासून कलर्स मराठीवर !

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
WhatsApp Group