पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात च्या १०१ व्या भागासाठी गौरव गीत सज्ज 

0

नाशिक,दि.२३ मे २०२३ – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या २८ मे रोजी होणाऱ्या १०१ व्या मन की बात रेडिओ भागाचे स्वागत करणारे भारतातील एकमेव मन की बात गौरव गीत आता नव्या रूपात देशभर प्रसारित होण्यास सज्ज झाले आहे या गीताची संकल्पना गीत संगीत आणि गायन अशा सर्व आघाडी सांभाळणारे संगीतकार संजय गीते यांनी या गीताची  प्रस्तुती केली आहे तसेच व्हिडिओची बाजू सुमंत वैद्य यांनी सांभाळली आहे .नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती श्री गणेश गीते यांनी ह्या निर्मितीला प्रायोजित केले आहे गीताच्या ऑडिओ व्हिडिओ तयार करण्यास गणेश गीते यांनी मोलाचे सहाय्य केले आहे

हे गीत देशभर पोहोचवण्यात महत्वाचा पुढाकार नितीन वानखेडे यांनी घेतला आहे. हे गीत लवकरच प्रसारीत होणार असून सर्वांनाच याची प्रतीक्षा आहे. हे गीत  स्वतः संजय गीते यांनी लिहिले असून श्रावणी गीते आणि संजय गीतेंनी गायिले आहे

आठ वर्षे सतत चालणाऱ्या ह्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे मोदींजींचा सातत्यगुण,किमान ५०० नागरिकांशी त्यांनी साधलेला थेट संवाद.नाशिकच्या स्वच्छाग्रही चंद्रकिशोर पाटीलसह अनेक सामान्य नागरिकांना,त्यांच्या कामगिरीला जगासमोर आणणारा हा कार्यक्रम त्यातून अनेकांच्या सफलकथा ऐकायला मिळाल्या देशातील अनेक योजनाची माहिती मिळाली आणि देशभक्तीची प्रेरणा मिळाली आणि ह्या सर्व बाबीतून  हे गीत आकाराला आले असे संगीतकार संजय गीतेनी सांगितले.

आगामी १०० भागांच्या स्वागताचा सूर असलेले हे गीत आतापर्यंत  प्रसारित झालेल्या १०० भागांचा गौरव करणारे असून अत्यंत ऊर्जा देणारे बिट्स, लयबद्ध शब्द योजना ,उंच सप्तकातील गायन आणि वेगवान दृश्य यामुळे हे गीत मनाचा ठाव घेणारे झाले आहे

हा रेडिओ कार्यक्रम ज्यांनी ऐकला नाही ते नवीन श्रोते देखील हे गीत ऐकून जोडले जातील अशी आशा.श्री गणेश गीते यांनी व्यक्त केली.हे गीत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्रालय,प्रसार भारती मंत्रालय दिल्ली यांच्याद्वारे नक्कीच देशभर पोहोचेल असा विश्वास श्री नितीन वानखडे यांनी व्यक्त केला.पंतप्रधान मोदीजींचे सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासुवृत्ती, जनतेशी त्यांचा होणारा संवाद आमच्या युवा पिढीला मोटिवेशन देणारा ठरत आहे असे गीताच्या गायिका श्रावणी गीते यांनी म्हटले आहे

हे गीत सध्या संजय गीते यांच्या youtube चॅनलवर उपलब्ध आहे तसेच जगातील ३०० ऑडिओ प्लॅटफॉर्मवर देखील दाखल होत आहे हे गीत श्रोत्यांनी जरूर ऐकावे त्यातून सकारात्मक ऊर्जा घ्यावी असे आवाहन सप्तरंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आनंद गौड ह्यांनी केले आहे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!