मुंबई,९ एप्रिल २०२३ – आपल्या लावणी आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलचा (Gautami Patil) डान्स पाहायला चाहते नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.एकीकडे गौतमी पाटीलवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला राडा होत असतो.तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी गौतमी आपल्या नृत्यामुळे आणि सोशल मीडियामुळे स्टार झाली.गौतमीने एका मुलाखतीत पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे.
गौतमीच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याला प्रत्येकालाच रस असतो. गौतमीने आजवर अनेकदा आई-वडील आणि शिक्षणाबद्दल सांगितलं आहे. पण आता पहिल्यांदाच तिने लग्नाबद्दल आणि जोडीदाराविषयीच्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं आहे.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली,”माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. बाबाचं लवकर निधन झालं त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे”.
आपल्या जोडीदाराबाबत बोलतांना गौतमी म्हणाली,”मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी २५ वर्षांची असून माझं लग्न झालेलं नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे”.
गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका होतो. पण तरीही तिने आपल्या अदाकारीने सर्वांना वेड लावलं आहे. गौतमीची मोठ्या प्रमाणात टीका झाली असली तरीही तिने यासर्व गौष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या डान्सवर फोकस ठेवला आहे. गौतमीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.