घाटकोपर दुर्घटनेमधील मृतांची संख्या ८ वर :मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

0

मुंबई,दि,१४ मे २०२४-मुंबईत अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात ८ जणाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनास्थळी अद्याप मदतकार्य जारी असून घटनेच्या ठिकाणी अजून काही जण अडकल्याची माहितीही देण्यात आली आहे.त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. होर्डिंगखाली जवळपास ८० वाहनं अडकल्याची माहिती समोर आली आहे. या होर्डिंग दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून आत्तापर्यंत ४७ जणांना बाहेर काढलंय.

जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. दुर्घटनास्थळी पेट्रोल पंप,सीएनजी ज्वलनशील पदार्थांमुळे गॅस कटर वापरण्यात अडचणी येत आहेत. होर्डिंगचा प्रचंड आकार आणि त्याखाली अडकलेल्या वाहनांची संख्या पाहता दुर्घटनेची भीषणता लक्षात येईल.

अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपामुळे इथला ज्वलनशीलतेचा धोकाही वाढलाय.त्यामुळे या भागातून नागरिकांना दूर करण्यास प्रशासनाने आणि पोलिसांनी सुरूवात केली.तर एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.