गिरीमित्र…स्पिकिंग व्हिल्सला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

0

नासिक – विषय होता, ‘डोंगर आणि सायकल’, त्यावर एका २२ वर्षीय युवकाने बनवलेल्या दोन लघूपटांच्या प्रदर्शनाचा, तो घेऊन गेला पर्यावरण संवर्धन आणि मानवी वर्तनाच्या दिशेने, त्याने प्रेक्षकांना विक्राळ रूप बनून उभ्या ठाकलेल्या हवामानबदल आणि पर्यटनातून उद्भवणार्‍या संकटाचे दर्शन घडविले.

प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या कार्यक्रमात कुसुमाग्रज स्मारकात या लघुपटांचे प्रदर्शन  करण्यात आले. चित्रपट आणि चलतचित्रमुद्रण या विषयावर पदवी संपादन करताना नासिकच्या यश नेने यांनी  अभ्यासक्रमाचा भाग म्हणून काही लघुपट तयार केले होते. ‘निसर्गायन’, आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’, यांच्या संकल्पनेतून त्यातील गिरीमित्र आणि स्पिकिंग व्हिल्स या लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन तुळस पूजन करून वैनतेयचे संस्थापक गिरिश टकले, रिड्सच्या जैवविविधता तज्ज्ञ जुई पेठे, वन्यजीव अभ्यासक प्रतिक्षा कोठूळे, गिर्यारोहक, पत्रकार प्रशांत परदेशी, स्पीकिंग व्हिल्सचे सहसंस्थापक राहुल नेने, नासिक सायक्लिस्टचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, ग्रंथ तुमच्या दारी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे , निसर्गायनचे समीर देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

गिरीमित्र या लघुपटाच्या प्रदर्शनापूर्वी  या लघुपटात आपली मते मांडणारे गिरिश टकले, जुई पेठे, प्रतिक्षा कोठूळे, प्रशांत परदेशी यांनी डोंगर, त्यावरील जैवविविधता या विषयी चर्चा केली. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचा होत असलेला संकोच, वृक्षतोड, वणवे, पुरातत्वीय अवशेषांचे जतन व संवर्धन, प्रेक्षकांच्या गर्दीचे संकट, पर्यटनाची दशा व दिशा, जंगलांना लागणारे वणवे, नासिकची दुर्गसंपदा या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
दुसर्‍या सत्रात स्पिकिंग व्हिल्सचे राहुल नेने व नासिक सायक्लिस्टचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी सायक्लिंयगच्या माध्यमातून भारतात विपूल प्रमाणावर पसरलेल्या रम्य स्थळांचे दर्शन. निसर्गाचा र्‍हास, या खेळातील आव्हाने आणि सायकलपटूंनी पादाक्रांत केलेल्या यशोदायी सायकल सफरींवर चर्चा घडवून आणली.

यश नेने याने दोन्ही लघुपटांच्या निमीर्ती मागची प्रेरणा कथन करून त्याला या प्रवासात प्रेरणा देणार्‍या व निर्मीतीस सहाय्य करणार्‍या वैनतेय, नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नासिक, नासिक सायकलिस्ट, स्पिकिंग व्हिल्स, ग्रंथ तुमच्या दारी, निसर्गायन यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पियू आरोळे यांनी केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!