गिरीमित्र…स्पिकिंग व्हिल्स लघुपटांचे बुधवारी कुसुमाग्रज स्मारकात प्रदर्शन 

0

नाशिक – अनादी काळापासून उभे असलेले आपले डोंगर माणसाला नेहमी आकर्षित करत आले आहेत. देवादिकांनाही त्यांचा मोह आवरता आला नाही तिथे माणसाची काय कथा. माणसाने वेगवेगळ्या युगात आपल्या पराक्रमाच्या आणि अनास्थेच्या कथा या डोंगरावर लिहील्यात…आजही रोज एक कथा डोंगराच्या भोवती फिरत आहे. डोंगर रक्षक, डोंगर पाठीराखे, डोंगर सखे, डोंगर देशनिर्माते, डोंगर आवडते, डोंगर हृदयातले, डोंगर मनामनातले! डोंगरांचं हे गारूड नासिकचा युवा चित्रपटकार यश नेने याने एका लघुपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.उत्तम चित्रणाला उत्तम संकल्पनेची जोड असलेला गिरीमित्र हा चित्रपट, बुधवारी १८ मे रोजी सायंकाळी ६-३० वाजता कुसुमाग्रज स्मारकात विशाखा सभागृहात बघायला मिळणार आहे.

या सोबत आणखी एक चित्रपट कच्छच्या रणातल्या सायक्लिंग वरचा या प्रसंगी बघायला मिळणार आहे. वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नासिक या संस्थांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हे दोन लघुपट आकारास येऊ शकले. या चित्रपटासोबत वैनतेयचे संस्थापक गिरिश टकले, रिड्सच्या जैवविविधता तज्ज्ञ जुई पेठे, वन्यजीव अभ्यासक प्रतिक्षा कोठूळे, गिर्यारोहक, पत्रकार प्रशांत परदेशी, स्पीकिंग व्हिल्सचे सहसंस्थापक राहुल नेने आणि नासिक सायक्लिस्टचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे या मान्यवरांसोबत निसर्ग हा मध्यबिंदू असलेल्या या कार्यक्रमात संवाद साधला जाणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना विनायक रानडे यांची असून या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नासिक, वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, स्पिकिंग व्हिल्स, नासिक साक्लिस्ट, ग्रंथ तुमच्या दारी, निसर्गायान यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.