गोदावरी नदीला पूरस्थिती, गंगापूर धरणातून ६१६० क्युसेकने विसर्ग वाढवला

0

नाशिक, दि. २३ जून २०२५ –  Godavari Flood Nashik नाशिक व गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून गंगापूर धरणातून विसर्ग ६१६० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर धरण व परिसरात संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला ३,९४४ क्युसेक वेगाने सुरू असलेला विसर्ग आज दुपारी  २ वाजता ६१६० क्युसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

या वाढीमुळे गोदावरी नदी पात्रात पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे सध्या पाण्याखाली गेलेली आहेत.

नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा 🙁Godavari Flood Nashik)
गोदावरी नदीच्या काठच्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
कोणीही नदीपात्रात उतरू नये,
पशुधन, शेतीमोटार पंप, व इतर सामान सुरक्षित स्थळी हलवावे.
प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

धरणात होणाऱ्या पाणी आवकानुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांत पुराचा धोका अधिक वाढू शकतो.नाशिककरांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील धरणातून विसर्ग दुपारी 3
दारणा – 4079 क्युसेक
गंगापूर – 6160
क्युसेक कडवा – 795 क्युसेक
होळकर ब्रीज – 7204 क्युसेक
नांदुर मध्यमेश्वर – 9465 क्युसेक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!