नाशिक,दि.२० मार्च २०२३ – जागतिक बँकिंग संकटाचा परिणाम आता सोन्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. याबाबत ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सोने ६१ हजारांच्या जवळ पोहोचले आहे, अशी माहिती दिली आहे.
सोन्याच्या दरवाढ आणि एकूण परिस्थितीबाबत अरोरा म्हणाले की, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 12:40 वाजता, किंमत प्रति 10 ग्रॅम 60,100 वर गेली आहे. त्याचवेळी, आरटीजीएस (बिल आणि जीएसटी) दर 61,700 वर गेला आहे. 2023/24 मध्ये, MCX वर सोन्याचा भाव 62,500 ते 67,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यूएस मधील व्याजदर 2023 च्या उत्तरार्धात किंवा 2024 च्या सुरुवातीस कमी होण्यास सुरुवात होईल. असे झाल्यास सोन्याचे भाव वाढतील. 22 मार्च रोजी, फेडरल बँक व्याज वाढवायचे की कमी करायचे याचा निर्णय घेईल. व्याज वाढल्यास सोन्याच्या किमतीवर दबाव येईल. सोने-चांदी खरेदीसाठी ही चांगली वेळ असेल. व्याजदर कमी झाल्यास सोने आणि चांदी वाढेल असे अरोरा म्हणाले.
जर MCX वर चांदीचा 72/73/74 हजार रुपये प्रति किलोचा मागील उच्चांक तोडला आणि येत्या काही महिन्यांत तो थांबला तर 2024 मध्ये ही किंमत 90 हजार ते 1 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. 2011 मध्ये आर्थिक संकट आले. तेव्हा चांदीचा भाव 73 ते 74 हजार रुपये प्रतिकिलो झाला होता. तेव्हापासून चांदीने ५ वेळा उच्चांक मोडण्याचा प्रयत्न केला आहे. व्याजदर कमी झाल्यास 74 हजार रुपये प्रतिकिलोच्या भावाला ब्रेक लागू शकतो, असे तज्ज्ञांचे ही मत आहे असे, नाशिक ऑल इंडिया ज्वेलरी अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे मेहुल थोरात यांनी सांगितले आहे.