नाशिकमध्ये स्वतःचे हक्काचे घर घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी :शेल्टर २०२२ चे भूमिपूजन संपन्न
२४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर डोंगरे वसतिगृह मैदानावर होणार ५ दिवसीय प्रदर्शन : प्रि-रेजीस्ट्रेशन केल्यास प्रदर्शनात मोफत प्रवेश
नाशिक,१६ नोव्हेंबर २०२२ –येत्या २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान गंगापूर रोड वरील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित होणारे शेल्टर गृह्प्रदर्शन हे गृहइच्छे पासून निर्णयापर्यंत येण्यासाठी उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन क्रेडाई राष्ट्रीय चे प्रमुख ( घटना समिती ) जितुभाई ठक्कर यांनी केले. या प्रदर्शन स्थळाच्या भूमिपूजन समारंभा प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन, महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनिल कोतवाल, शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील, माजी अध्यक्ष नेमीचंद पोतदार, सुरेश पाटील, उमेश वानखेडे हे मंचावर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, शहरासाठी सकारात्मक विचार असणारे नाशिककर यांच्यासाठी शेल्टर हा जणू काही गावाचाच उत्सव असल्यासारखे वातावरण असून नाशिक हे येत्या ५ वर्षात आशियामधील सर्वात वेगाने वाढणारे शहर ठरणार असल्याचेही त्यांनी सुतोवाच केले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, बांधकाम उद्योग हा शहराच्या अर्थकारणाशी निगडीत असून या उद्योगामधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. नाशिकमध्ये येऊ घातलेल्या अनेक नव्या संधींमुळे नाशिकचे भविष्यातील चित्र खूप आश्वासक असून आज रिअल ईस्टेट क्षेत्रात नाशिक मधील गुंतवणूक निश्चितच फलदायी ठरणार आहे.
विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा ‘नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात १०० हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प, बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांसह एकाच छताखाली असतील . हे ५ दिवसीय प्रदर्शन खऱ्या अर्थाने राज्यातील सर्वात भव्य गृह प्रदर्शन असून या प्रदर्शनास सुमारे १ लाखाहून अधिक दर्शक भेट देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
या प्रसंगी बोलतांना शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील म्हणाले की, यावेळचे शेल्टर हे एकदम वेगळ्या धर्तीवर आयोजित करण्यात येणार असून अनेक नवीन बाबी यात समाविष्ट केल्या आहेत. आर्कि. मिहीर मेहता तसेच सर्व माजी अध्यक्ष आणि मॅनेजींग कमिटी यांच्या एकत्रित प्रयत्नाने शेल्टर २०२२ मध्ये वेगळेपण जाणवेल.
यावेळी नाशिक सहित सिन्नर,दिंडोरी,धुळे,जळगाव,मालेगाव,त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी सुरू असलेले अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प एकाच ठिकाणी असून यामध्ये बजेट प्रॉपर्टी ते परवडणारी घरे ते अगदी पॉश अपस्केल डायनॅमिक लक्झरी प्रकल्प,प्लॉट,फार्म हाउस ,व्यवसायिक,शोप्स याचे देखील असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत.
हे प्रदर्शन अनेक अंगाने महारष्ट्रातील सर्वात भव्य प्रोपर्टी प्रदर्शन आहे . शेल्टर १.५ लाख+ चौरस फूट पॅव्हेलियन एवढ्या विस्तीर्ण जागेत पसरले असून हे पूर्णपणे पेपरलेस आहे. एक्स्पोमध्ये स्वतंत्र बिझनेस लाउंज आणि समर्पित नेटवर्किंग पॉड्स देखील असतील जिथे ग्राहक प्रदर्शकांशी संवाद साधू शकतात. याव्यतिरिक्त, विशेष ऑफर, लकी ड्रॉ आणि जिंकण्यासाठी आकर्षक स्पॉट बक्षिसे देखील असतील. त्याच शिवाय हैप्पी स्ट्रीट चे आयोजन देखील प्रदर्शन स्थळी करण्यात येईल २१ नोव्हेंबर पर्यंत ओंनलाईन नोंदणी करणाऱ्यास प्रदर्शनासाठी कोणतेही प्रवेश शुल्क लागणार नसून शिवाय अनेक आकर्षक स्कीम आणि ऑफर देखील येथे देण्यात येत आहेत . क्रेडाई नाशिक मेट्रोनेही सोय लक्षात घेऊन नाशिकच्या महत्त्वाच्या ठिकाणांहून वाहतूक व्यवस्था केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले .
क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर व महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनिल कोतवाल यांनी शेल्टर २०२२ पूर्णपणे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला .
दृष्टीक्षेपात शेल्टर २०२२
१. शेल्टर २०२२ ला मोफत प्रवेशासाठी दिलेला क़्युआर कोड स्कॅन करावा. (२१ नोव्हेंबर पर्यंत)
२. आकर्षक दर तसेच गृहकर्जावर पण ऑफर
३. जागतिक दर्जाच्या सुविधा
४. नाशिक मधील सर्वप्रथम लेगसी वाल
५. पेपरलेस प्रदर्शन
६. प्रदर्शनास भेट देणार्यामधून दहा लकी ड्रो विजेता आणि एक बम्पर बक्षिस
७. लहान मुलांसाठी प्ले एरिया आणि फन झोन
८. रोज हैप्पी स्ट्रीट मध्ये स्थानिक कलाकारंसह संगीत आणि फन फेअर
प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सह्साचीव अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी, सागर शहा, मनोज खिंवसरा, सचिन बागड, विजय चव्हाणके, अतुल शिंदे, सतीश मोरे, सचिन चव्हाण, अनंत ठाकरे, सुशांत गांगुर्डे, सत्यजित महाजन, सुशील बागड, हंसराज देशमुख, श्रैनिक सुराणा तसेच सर्व सदस्य कार्यरत आहेत .याप्रसंगी पूजा व विधी अभिषेक महाजन व सौ वृषाली महाजन यांच्या हस्ते संपन्न झाली.