साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगची सुविधा 

0

शिर्डी,दि.८ एप्रिल २०२३- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत ट्रेनने शिर्डीला जोडल्यानंतर मोदी सरकारने आता शिर्डीला तिसरी भेट दिली आहे.शिर्डीतील विमानतळावर साईभक्तांसाठी आता नाईट लँडिंगचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी दाखल होणाऱ्या लाखो साईभक्तांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.

समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत ट्रेनने शिर्डीला जोडल्यानंतर मोदी सरकारने आता शिर्डीला तिसरी भेट दिली आहे. शिर्डीत आता साईभक्तांसाठी नाईट लँडिंगचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी दाखल होणाऱ्या लाखो साईभक्तांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.आता महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमधून शिर्डीत काकड आरतीसाठी येणाऱ्या लाखो साईभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाईट लँडिंगमुळं शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पासून म्हणजेच आठ एप्रिलपासून दिल्लीहून येणाऱ्या  विमानांचं शिर्डीत नाईट लँडिंग होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इंडिगो कंपनीचं विमान आज रात्री आठ वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर नाईट लँडिंग करणाऱ्या विमानांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे.प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू होता. त्यामुळं आता केंद्राच्या या निर्णयामुळं भाविकांना शिर्डीत पोहोचणं आणि परतणं सुलभ होणार आहे.गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. यापूर्वी शिर्डी विमानतळावरील विमानांच्या धावपट्ट्यांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता नाईट लँडिंगची व्यवस्था झाल्यामुळं साईभक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

साधारण २०१७ ला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी विमानतळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये हैदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू येथील प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु साईबाबा मंदिरात काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील भाविकांना शिर्डीत मुक्काम करावा लागत होता. परंतु आता विमानांच्या नाईट लँडिंगमुळं राज्याबाहेरील प्रवाशांना काकड आरती करत तातडीनं विमानानं परतणं शक्य होणार आहे.

नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त झाल्यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे आता प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला १३ विमानसेवा असून या निर्णयामुळे भाविकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणं अपेक्षित आहे. तसंच, स्थानिक अर्थकारणाला गती मिळणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.