नवी दिल्ली- रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा खूपच फायदा होतो.आत्तापर्यंत गुगल मॅपचा वापर नेव्हिगेशनसाठी केला जात होता. मात्र, आता त्यात नवीन फिचर ऍड केले आहे. वेळेनुसार गुगलने अनेक फिचर्स ऍप मध्ये ऍड केले आहेत. या लिस्टमध्ये आता फ्यूल सेव्हिंग फिचरदेखील ऍड करण्यात आले असून हे फिचर फ्यूल एनर्जीचा अंदाज सांगते.
प्रत्येकाच्या जीवनात मोबाइल फोन आणि इंटरनेट हा अविभाज्य घटक बनला आहेत. जसजशी मोबाइलची गरज वाढली आहे त्यासोबतच त्यातील काही फिचरही रोजच्या आयुष्यात सर्रास वापरले जातात. गुगल मॅपचे हे नवे फिचर्स अमेरिकेत पूर्वीपासूनच हे फिचर उपलब्ध होते . सप्टेंबर २०२२ मध्ये हे फिचर लाँच केले होते. कॅनडा, अमेरिका आणि युरोपनंतर आता अखेर भारतात हे फिचर ऍड करण्यात आले आहे.
हे फिचर फ्यूल एनर्जीचा अंदाज सांगते. म्हणजेच एका मार्गावर तुमचे किती पेट्रोल खर्च होईल,याची शक्यता सांगते.गुगल मॅप याचा अंदाज त्या मार्गावर असलेल्या ट्रॅफिक आणि रस्त्याची अवस्था याआधारे सांगते. त्यानंतर गुगल मॅप कडून दुसराही मार्ग सांगण्यात येतो. त्या मार्गावर किती ट्रॅफिक असेल आणि किती पेट्रोल लागेल याचाही अंदाज सांगितला जातो. आता युजर्सनी कोणता मार्ग वापरावा हे त्यावर अवलंबून आहे. जवळचा मार्ग आणि ट्रॅफिकचा अंदाज घेऊन मार्ग वापरल्यास वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे या फिचर च्या वापरा मुळे महिन्याला पेट्रोलच्या खर्चात निश्चित कपात होऊ शकते.