मुंबई २ ऑक्टोबर २०२२ – ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो, ज्याने लॉकडाउनमध्ये एंटरटेनमेंट अनलॉक केलं, सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या बातम्यांना आणि चर्चेला उधाण येतं, आणि तो येताच सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा असते. कारण चर्चा त्याचीच होते ज्यात काही खास असतं ! यावर्षी तो परत येतोय अधिक भव्य स्वरूपात, काही नव्या सरप्राईझेसना घेऊन.बिग बॉस मराठी सिझन ४ च्या ग्रँड प्रिमियरला शानदार सुरुवात झाली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत असणार आहेत १६ सदस्य १०० दिवस. कसा असेल त्यांचा हा प्रवास. प्रत्येक आठवड्यामध्ये किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धकांद्वारे तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नॉमिनेट करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरी पर्यंत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टिकून राहील तो चौथ्या सिझनचा विजेता ठरणार आहे.
बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये नाशिकचे दोन सदस्यांचा सहभाग
या सिझन मध्ये एअर टेल तर्फे नाशिकच्या त्रिशूल मराठे याला सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.तर अभिनेत्री तेजस्वी लोणारी हि नाशिक जिल्ह्यातील येवल्याची आहे.
खालील स्पर्धक असतील बिग बॉस च्या घरामध्ये








अपूर्वा नेमळेकर







