बागकाम करताना आजोबांना सापडला ४०० वर्षे जुना खजिना

0

लंडन – जीवनात असे काही प्रसंग घडतात त्याने आपले आयुष्याचं बदलून जातं. इंग्लंडमधील ब्रॉन्टन येथे वास्तव्यास असलेले आतोबांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडल्याने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. ब्रॉन्टन येथे त्यांच्या जुन्या फार्म हाऊसमध्ये बागकाम करत असतांना त्यांना शेकडो वर्ष जुना खजिना सापडला. जेव्हा त्यांच्या हाती हा खजिना लागला तेव्हा त्यांना माहिती होते की हा खूप मौल्यवान असेल, पण ती इतकी महत्त्वाची वस्तू असेल हे त्यांना माहिती नव्हतं

७१ वर्षीय रिचर्ड मॅककाई यांना त्यांच्या १६ व्या शतकातील फार्महाऊसमध्ये एक असामान्य खजिना गवसला. खरंतर हा खजिना एक अंगठी आहे, जी ४०० वर्षे जुनी आहे. ही अंगठी खूप मौल्यवान असल्याची माहिती आहे आणि त्यावर डिझाइनही आहे. रिचर्डला नोव्हेंबर २०१२ मध्ये बागेची साफसफाई करत असताना त्यांना ही अंगठी सापडली होती.

द सनच्या रिपोर्टनुसार, रिचर्ड यांना जेव्हा ही अंगठी मिळाली तेव्हा ते खूप उत्साहित झाले. ही अंगठी किती मौल्यवान आहे हे त्यांना माहित नव्हते. जेव्हा त्यांना याची किंमत कळाली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. लंडनस्थित लिलावकर्ता नूनन्सने जेव्हा ती विकली तेव्हा त्या अंगठीची किंमत १२,००० डॉलर्स म्हणजेच ११ लाख ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. रिचर्ड यांनी सांगितले की किंमत ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

त्यातून मिळालेले पैसे ते आपल्या मुलांची मदत करण्यासाठी वापरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.लिलाव गृह सल्लागार निगेल मिल्स यांनी सांगितलं की, ही अंगठी १६२० ची आहे आणि ती कुलॉम्प्टन, डेव्हॉनच्या हम्फ्रे कॉकरमची होती. अंगठीच्या मागील बाजूस एचसी लिहिलेलं आहे. कॉकरम कुटुंब १६२० मध्ये हिलर्सडन मनोर येथे राहत होते. जेथे ही अंगठी सापडली होती तेथून ४२ मैलावर ते राहात असल्याची माहिती आहे. ही अंगठी शुद्ध सोन्याची असून तिची जाडी २० मिमी आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.