इंडोनेशियात भारतीय उद्योजकांना मोठ्या संधी : इंडोनेशियाच्या उच्चाधिकाऱ्यांची माहिती
इंडोनेशियाच्या वाणिज्य दूतावासातील कौन्सिल जनरल अगूस पी.साप्तनू यांची आयमा कार्यालयास भेट
नाशिक- इंडोनेशियात भारतातील उद्योजकांना सर्व क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असून त्यासाठी इंडोनेशिया सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. इंडोनेशियात नाशिकच्या उद्योजकांनाही गुंतवणूक केल्यास त्यांचे स्वागतच आहे,असे आवाहन इंडोनेशियाच्या वाणिज्य दूतावासाचे कौन्सिल जनरल अगूस पी.साप्तनू यांनी केले.
इंडोनेशियाच्या वाणिज्य दूतावासातील कौन्सिल जनरल अगूस पी.साप्तनू आणि पेंग की.बी.पी.सापुत्रा यांनी काल नाशिक दौऱ्यात आयमा कार्यालयास भेट देऊन तेथील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना साप्तनू बोलत होते यावेळी उद्योजकांनी इंडोनेशियातीळ गुंतवणूक आणि नवीन उद्योगांबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून त्यांचे समाधान केले. यावेळी उद्योजक हर्षद बेळे यांनी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबाबत इंडोनेशियात काही नवीन संधी आहेत कायताबाबत सूचना मांडून चर्चा केली.
शिक्षणक्षेत्र,फार्मास्युटिकल,ग्रीनएनर्जी तसेच इ-व्हेईकल उद्योगाच्या संधी याबाबतही यावेळी चर्चा झाली.इंडोनेशिया नाशकात कशी गुंतवणूक करू शकेल याबाबत विचारलेल्या प्रश्नांना महाराष्ट्रात इंडोनेशियांच्या दहा कंपन्यांनी गुंतवणूक केली असून आणखी काही कंपन्यांना नाशकात आणण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊ असे त्यांनी निदर्शनास आणले.यावेळी इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने उद्योगधंद्यांबाबत मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठीचे निमंत्रणही आयमाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आयामाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी आयमाच्या माध्यमातून इंडोनेशिया व भारत यांच्यातील उद्योग व्यापार कशाप्रकारे वाढवता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली त्यासाठी इंडोनेशियाच्या शिस्टमंडळ उद्योजकांच्या चर्चेसतेही बोलावले आहे यामुळे नक्कीच संधी उपलब्ध होतील,असेही ते पुढे म्हणाले.आयमाचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी इंडोनेशियाच्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि आयमाच्या यशाच्या वाटचालीचा आलेख सादर केला.इंडो-अमेरिकन चेंबरचे अध्यक्ष सौरभ शाह यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.यावेळी इंडोनेशियाच्या पाहुण्यांबरोबर आयमातर्फे परस्पर देवाणघेवणीचे सामंजस्य करारही झाले.
यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, प्रमोद वाघ, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, हर्षद बेळे, जगदीश पाटील, जयंत जोगळेकर, राहुल गांगुर्डे, जयंत पगार , देवेंद्र राणे, विराज गडकरी रवींद्र झोपे, मनीष रावळ, धीरज वडनेरे देवेंद्र विभुते रवींद्र महादेवकर,योगिता आहेर आदी उपस्थित होते