GST,प्लास्टिक बंदी,एपीएमसी कायदा,व्यापार उद्योगाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार-मुख्यमंत्री

व्यापार उद्योगाला पूरक धोरण राबवणारे सरकार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

राज्यातील व्यापार उद्योग व कृषी क्षेत्राला पूरक असे आमचे सरकार असून राज्यातील व्यापार उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे आणि त्यांना चालना देण्याचे कार्य हे सरकार करेल तसेच जीएसटी , प्लास्टिक बंदी व एपीएमसी कायदा हे व्यापार उद्योगाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची घोषणा महाराष्ट्र चेंबरने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबर ची माहिती दिली तसेच जीएसटी तरतुदी संबंधित अडचणी बाजार समिती कायदा प्लास्टिक बंदी यामुळे व्यापार उद्योगात होत असलेल्या अडचणींची माहिती थोडक्यात दिली. अन्नधान्यावरील जीएसटी कर रद्द करावे एपीएमसी कायद्यात बदल करण्यात यावा रद्द करण्यात यावा व प्लास्टिक बंदी स्थगिती द्यावी जोपर्यंत प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्लास्टिक बंदीचा मिळण्याला स्थगिती देण्याची मागणी अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे अमेरिकेमध्ये आयोजित बिजनेस कॉन्फरन्सला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले.

महाराष्ट्र चेंबर तर्फे २ ते ११ डिसेंबर२०२२ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्सपो च्या माहितीपत्रकाचे अनावरण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र चेंबरने राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र चेंबरने कृषी पूरक उद्योग यांच्या विकासासाठी काम करावे. राज्यातील कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या प्रस्तावाला चालना देण्यात येईल. राज्यामध्ये वाढ गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घ्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल एग्रीकल्चर तर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापारी महापरिषद   छत्रपती संभाजीनगर सागर लॉन, जालना रोड येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी,उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल मालानी, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी,  औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे विजय जयस्वाल, घनश्याम गोयल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र भाटिया यांनी बाजार समिती कायदा याविषयी थोडक्यात माहिती दिली तसेच जीएसटी विषयी उमेश शर्मा यांनी माहिती दिली. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार प्रदर्शन महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी यांनी केले.महाराष्ट्र व्यापारी महापरिषदेला मोठ्या संख्येने राज्यातून व्यापारी उपस्थित होते.

१)अन्नधान्यावरील जीएसटी कर रद्द करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार.
२)प्लास्टिक बंदी च्या कायद्याचे अवलोकन करून त्याबाबत योग्य त्या दुरुस्ती करण्यात येईल.
३)महाराष्ट्र चेंबर तर्फे आयोजित या परिषदेमध्ये जीएसटी कर रद्द करणे प्लास्टिक बंदी ला स्थगिती देणे या तीन महत्त्वाच्या विषयां सह अन्य विषयावर महाराष्ट्र चेंबरच्या  पदाधिकाऱ्या समवेत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.