गांधीनगर,३ नोव्हेंबर २०२२ – केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा केली आहे.गुजरातमध्ये विधानसभेच्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिला टप्पा १ डिसेंबरला होणार आहे तर दुसरा टप्पा ५ डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर केला असून या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
दरम्यान, गेली २५ वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.२०१७ मध्ये, गुजरातमध्ये ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान पार पडलं होतं.या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपनं ९९ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं ८० जागा जिंकल्या होत्या . पण निकालाअंती भाजप आणि काँग्रेस यांच्या जागांमध्ये केवळ १९ जागांचा फरक होता. बहुमत भाजपला मिळालं असलं तरी काँग्रेसनं भाजपला चांगलीच झुंज दिली होती, गेली २५ वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.
पहिला टप्पा निवडणूक कार्यक्रम
नोटिफिकेशन – ५ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १४ नोव्हेंबर
अर्जांची छाननी – १५ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर
मतदान – १ डिसेंबर
दुसरा टप्पा निवडणूक कार्यक्रम
नोटिफिकेशन – १० नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर
मतदान – ५ डिसेंबर
दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकाल – ८ डिसेंबर