नाशिक – नाशिकमधील गेल्या ५३ वर्षांपासून संगीत क्षेत्रात तबल्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पवार तबला अकादमीचा गुरुपौर्णिमा उत्सव दि. २६ ऑगस्ट रोजी सायं ६ वा कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात साजरा होत आहे. कार्यक्रमाला डॉ.अविराज तायडे ,पं. मकरंद हिंगणे आणि रघुवीर अधिकारी हे प्रमुख अतिथी असतील.
भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून या कार्यक्रमात पवार तबला अकादमीचे सुमारे ७५ विद्यार्थी त्रिताल ,झपताल, एकताल,रूपक, मत्त ,रुद्र इ . तालात सहवादन सादर करून अमृत महोत्सवास मानवंदना देणार आहेत. त्याशिवाय अकादमीचे युवा तबलावादक आशुतोष इप्पर,रोहित श्रीवंत(तबला),प्रफुल्ल पवार (केजॉन),ओंकार कोडिलकर (जेंबे ) हे भारतीय व पाश्चात्य तालवाद्यांचा मिलाफ असलेले फ्युजन सादर करतील.
यानंतर अद्वय पवार (कै. पं. भानुदास पवार यांचे नातू, अकादमीचे संचालक गुरु नितीन पवार यांचे सुपुत्र आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य )यांचे स्वतंत्र तबलावादन होईल. कार्यक्रमाची सांगता अकादमीचे ज्येष्ठ विद्यार्थी सुजीत काळे व कुणाल काळे( गुरु नितीन पवार आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य ) यांच्या सहवादनाने होईल. कार्यक्रमाचे निवेदन मंगेश जोशी, ध्वनिव्यवस्था सचिन तिडके तर छायाचित्रण महारुद्र आष्टुरकर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संगीतप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीच्या वतीने केले आहे .