नाशिक,दि,४ सप्टेंबर २०२४ –नाशिकमधील गेल्या ५५ वर्षांपासून संगीत क्षेत्रात तबल्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पवार तबला अकादमीचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुपौर्णिमा उत्सव आज बुधवार , दि. ४ सप्टेंबर रोजी संध्या ६ वा,विशाखा सभागृह ,कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे आयोजित केला आहे. देवदत्त जोशी ,प्रमुख सचिव ,सार्वजनिक वाचनालय ,नाशिक हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी असतील.
या उत्सवात पवार तबला अकादमीचे ज्येष्ठ विद्यार्थी सुहास बेरी , मंगेश जोशी ,भास भामरे ,रूपक मैंद , राधिका गायधनी ,अमित भालेराव ,कुशल दीक्षित शुभम जोशी, राजेश भालेराव यांचे तसेच मल्हार चिटणीस ,यश मालपाठक ,सारंग तत्ववादी ,आशुतोष इप्पर तबला सहवादन सादर करतील. तसेच रोहित श्रीवंत ,ओंकार कोडिलकर आणि प्रफुल्ल पवार यांचे फ्युजन सादर होणार आहे .
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अकादमीचे ज्येष्ठ विद्यार्थी व पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य अद्वय पवार ,कुणाल काळे आणि सुजीत काळे यांचे स्वतंत्र तबलावादन होईल. या कार्यक्रमासाठी पुष्कराज भागवत ,प्रतीक पंडित संवादिनी साथसंगत करतील.
कार्यक्रमाचे निवेदन सुनेत्रा महाजन-मांडवगणे ,ध्वनी सचिन तिडके आणि ग्राफिक्स मिथिलेश मांडवगणे करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नाशिककर रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीच्या वतीने करण्यात येत आहे.