हेल्दी रेसिपी : नागलीचा चॉकलेट-अक्रोड केक

0

साहित्य – १ कप नागली चे पीठ , १ कप दूध , एक मोठा चमचा चॉकलेट पावडर, अर्धा वाटी पिठीसाखर,एक वाटी तेल,एक चमचा बटर किंवा घरचे तूप अर्धा टी स्पून बेकिंग पावडर,अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून लिंबाचा रस,एक वाटी अक्रोड,अर्धे केळ,

कृती – प्रथम दोन भांडी घ्या एका भांड्यात अर्धा चमचा बटर किंवा घरचे तूप घ्या व १ वाटी तेल घाला त्यानंतर त्यामध्ये हळूहळू पिठीसाखर घाला आणि एकजीव होईपर्यंत फेटून घ्या त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून घाला आणि त्यानंतर एक वाटी कोमट दूध या मिश्रणात मिक्स करा आणि एकजीव होईपर्यंत फेटून घ्या.

दुसऱ्या भांड्यात नागलीचे पीठ चाळून घ्या त्यामध्ये केळ कुस्करून मिक्स करा, बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा ,चॉकलेट पावडर, या सर्व जिन्नस घाला अर्धावाटी अक्रोडचे बारीक तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून या मिश्रणात बरोबर फेटून घ्या

एका पातेल्यात दोन चमचे तूप घ्या व ते थोडे गरम करून त्यात अक्रोडचे काप टाका तुपात मिक्स करून ते थंड करायला ठेवा

तुम्ही जर कुकरमध्ये केक बनवला असाल तर भरपूर मीठ घेऊन ते कुकरमध्ये टाका आणि मंद आचेवर प्री हीट करण्यासाठी ठेवा( कुकरची शिट्टी काढून ठेवा)

ओव्हन १० मिनिटे १८० डिग्रीवर प्रि हिट करायला ठेवा.आता पहिल्या आणि दुसऱ्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस एकत्र करा आणि एकजीव फेटून घ्या केकच्या भांड्यामध्ये सर्व बाजूंनी तूप किंवा तेल लावा आणि थोडीसे पीठ भुरभुर घ्या आता केकच्या भांड्यामध्ये सर्वात शेवटी थोडे लिंबू पिळा व छान मिक्स करून हे मिश्रण केक टिन मध्ये घाला आणि शेवटी हे मिश्रण केकच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आपले तुपामध्ये ठेवलेले अक्रोड डेकोरेशन म्हणून केकच्या वर घालावे व केक बेकिंगला ठेवावा ओव्हन मध्ये 180 डिग्रीवर ३० ते ३५ मिनिटे हा केक ठेवा आणि कुकरमध्ये मिडीयम फ्लेमवर ४० ते ४५ मिनिटे हा केक ठेवा.

त्यानंतर केक थंड करा आणि सर्व्ह करा ..

ओजस्वी केतकर – भिडे
लंडन
मोबाईल – +४४७५८७३१०६५९

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!