मुंबई – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असतांनाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावनी आता थेट २२ ऑगस्टला होणार आहे.त्यामुळे या सत्ता संघर्षचा फैसला आणखी दहा दिवस लांबणीवर गेला आहे.
यापूर्वी दोन वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे.या सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम हा महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहिल याची शक्यता आता कमी आहे.त्यामुळे आता या प्रकरणाचं काय होईल हे २२ तारखेला स्पष्ट होणार आहे.
खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कुणाकडे जाणार यावर हा सुनावणीनंतर निर्णय होणार आहे.