नाशिक मध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस : सायंकाळी ७६.८ मिमी पावसाची नोंद 

गंगापूर धरणातून २००० क्युसेक  पाण्याचा विसर्ग 

0

नाशिक,८ सप्टेंबर २०२२ – नाशिक जिल्ह्यासह शहर परिसरात सायंकाळी ५:३० नंतर विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.या वर्षातील या हंगामात आज नाशिक शहर परिसरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणावर विजांचा कडकडाट झाला असून सायंकाळी ५:३० ते ८:३० या वेळात नाशिकमध्ये  ७६.८  मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.गंगापूर धरण क्षेत्रात मोठयाप्रमाणावर पाऊस पडल्याने धरणातून २००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.रात्री १० नंतर तो २५०० क्युसेकने वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

दरम्यान व्दारका ते हॉटेल जत्रा दरम्यान उडडाणपुलावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच व्दारका ते नाशिकरोड मार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. सातपूर कॉलनी परिसरात पावसाळी गटार योजनेचा भोंगळ कारभार समोर आला. कॉलनी परिसरात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील फुल बाजार परिसरात ड्रेनजचे चेंबरमधून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसरात तर गुडघाभर पाणी साचले होते त्यामुळे परिसरातील दुचाकी वाहने पाण्यात गेली.

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या सिन्नर, इगतपुरी, त्रंबकेश्वर या तीन तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून उर्वरित तालुक्यात पाऊस नाही, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून  विसर्ग वाढवणार असल्याने  गोदावरी नदीच्या पातळी मध्ये  मोठी वाढ होणार आहे  जोरदार पावसामुळे शहारातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आले होते तर उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाण्यात अनेक गाड्या बंद पडल्याने वाहनचालकांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले.प्रचंड पावसामुळे नाशिक शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक ठिकाणी लाईट गेली आहे.

व्हिडिओ पहा 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.