पुढील ४८ तासात राज्यातील ‘या’ भागात पाऊस धुमाकूळ घालणार : हवामान विभागाचा इशारा

देशात का दिसून येतायत इतके हवामान बदल ?  

0

मुंबई,दि. ७ एप्रिल २०२३ – महाराष्ट्रासह देशभरात पावसानं हजेरी लावली आणि अवकाळीचा तडाखा सर्वांनाच हैराण करून गेला आहे.राज्यात आजपासून (दि.७) वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा विदर्भाच्या काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

एकीकडे राज्यात तापमान वाढत आहे.राज्यातील काही भागात तापमान ४० अंश सेल्सिअस च्या पुढे गेले.उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १५ ते २७ अंशांच्या दरम्यान होता. मागच्या २४ तासांत अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. दरम्यान या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र याभागात जोेरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दमट हवामान झाल्याने उकाडा वाढल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे जाणवत आहे.

काल गुरुवारी सातारा, महाबळेश्वर, पाचगणी भागात अवकाळीनं जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर या भागात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतही पाणीच पाणी झालं. या अवकाळी पावसाचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसणार असल्यामुळे सध्या बागायतदारांवर वेगळंच संकट ओढावलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्यात पुढचे २ दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

दरम्यान राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील २४ तासांत देशातील हवमानाचा अंदाजा नुसार  झाल्यास, तेलंगाणा, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकचा काही भाग, आसाम, अरुणाचल प्रदेश या भागांत पावसाची हजेरी असणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ या भागांमध्येही पावसाच्या तुरळत सरी बरसतील असी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशात का दिसून येतायत इतके हवामान बदल ?
पश्चिमी झंझावातामुळं देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. देशाच्या काही भागांत पाऊस तर, काही भागांत हिमवृष्टी होताना दिसत आहे. सुरुवातीला या वातावरणामुळं उन्हाळ्यापासून नागरिकांची सुटका झाली होती. पण, आता मात्र नागरिकांच्या आरोग्यावर या हवामान बदलांचे थेट परिणाम दिसून येऊ लागले आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.